मिठाईच्या दुकानात चोराचा डल्ला


मिठाईच्या दुकानातील गल्ल्यावर चोराने डल्ला मारला. वाशीतील भरत शर्मा यांच्या दुकानात घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. दिवाळीच्या दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी केल्याचे हेरून चोरांनी त्या ठिकाणी चोरी केली आहे. 
त्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील १ लाख ५ हजारांची रोकड पळवली आहे. यासंदर्भात मंगळवारी त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरून अज्ञात दोघांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने