चिठ्ठी काढून केली होती निवडणूक बिनविरोध


निवडणूक सुरु झाली की, उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी, आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा, आश्वासने देणं सुरु होतं. अशा वातावरणात निवडणूक बिनविरोध होणं हे अगदी स्वप्नवतच. पुण्यात मात्र तत्कालीन नगरपालिका असताना १९२६-२७मध्ये कसबा वॉर्डात बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता.
 या वॉर्डामध्ये तीन जागा आणि उमेदवार चार होते. तेव्हा चिठ्ठ्यांमध्ये नावं लिहून ज्या तीन उमेदवारांची नावं आली त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रसंग पार पडला होता.
थोडे नवीन जरा जुने