पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम शेठ म्हात्रे यांच्याबरोबर उरण तालुक्याचा प्रचार दौरा केला.
या दौर्यामध्ये त्यांनी सोनारी, करळ, जासई ,एकट घर, रांजणपाडा ,सुंदरपाडा ,धुतुम, चिरले, गावठाण, जांभूळपाडा, कातकरवाडी वेश्वी दादर पाडा, दिघोडे विंधणे, खालचा पाडा, नवापाडा, धाकटीजुई बोरखार, काठी, रानसई इत्यादी गावांचा दौरा केला. त्या ठिकाणी त्यांनी प्रीतम दादा म्हात्रे यांना बहुमताने शिट्टी या निशाणीवर मतदान करून निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे.
त्यांच्याबरोबर उरण तालुका अध्यक्ष अमित वाघमारे, चंद्रकांत वेळासकर, अशोक वाघमारे धनराज खैरे, बळीराम गायकवाड, लोचन गायकवाड, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते प्रचारासाठी उपस्थित होते.
Tags
पनवेल