आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सूक्ष्म घटकांबरोबर कळंबोली मध्ये बैठकांचा धडाका



पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी निवडणुकीचे सूक्ष्म प्लॅनिंग करून समाजातील विविध घटकांबरोबर बैठकांचे सत्र सुरू आहे गोव्याचे आमदार व सरचिटणीस माननीय दयानंद सोपटे तसेच संघाचे माधव गांगुर्डे व कळंबोलीतील ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे धडाडीचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी कळंबोलीतील संपूर्ण परिसर पिंजून काढला . 
वेगवेगळ्या समाजाबरोबर बैठका घेतल्या त्यामध्ये प्रामुख्याने पंजाबी समाजासमोर बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी समाजातील अशा काही घटकांवर प्रकाश टाकला की ते ऐकून कोणाचेही मन सुन्न होईल . कळंबोलीच्या परिसरामध्ये ड्रग्स माफिया तसेच गांजा चरस अशा गोष्टींनी थैमान मांडलेले आहे तक्रारी करून सुद्धा पोलिसांकडून हवी तशी कारवाई होत नाही त्यामुळे त्यांनी अशी मागणी केली आहे की आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्यासोबत बैठक घेऊन पोलिसांच्या वरच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन या सर्व गोष्टींचा निपटारा करायचा आहे कारण तरुण पिढी जर व्यसनाधीन झाली तर समाजाचे भवितव्य अवघड आहे हे ओळखून पंजाबी समाजातील काही तरुणांनी त्यांच्या ह्या व्यथा व कहाण्या आमदार दयानंद सोपटे यांच्यासमोर मांडल्या. त्यांनीही असे आश्वासित केले आहे की या सर्व गोष्टी मी आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्यासमोर मांडेल 

. व बबन बारगजे यांनी या लोकांना घेऊन आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्यासमोर निवडणूक झाल्यानंतर एक बैठक घालून द्यावी . त्याचप्रमाणे तृतीय पंथीयांचा मुंबई पुणे हायवेवर रोज संध्याकाळी धुमाकूळ चालू असतो त्यावर सुद्धा बंधन यायला हवीत कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यांचा खूप त्रास होत आहे . यावेळी बबन बारगजे यांनी सुद्धा सांगितले की निवडणूक झाल्यानंतर या सर्व गोष्टीचा आम्ही मंडळातील पदाधिकारी व आपण सर्व मिळून या गोष्टींचा नायनाट करू . त्या सर्व लोकांनी सांगितले की आम्ही एक एक मत प्रशांत ठाकूर यांना देऊ व प्रचंड बहुमताने निवडून आणू . पंजाबी समाजाच्या बैठकीसाठी अमरजीत सिंग शाहविंदर सिंग मनराज सिंग मालकीत सिंग तुर्मित सिंह मान, लाडी सिंग निशांत गिल व प्रिन्स सोनी सहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते .
रविवार दिवस असल्याने दिवसभर बंजारा समाजाची बैठक झाली त्यामध्ये भगवान पवार , वसंतराव नाईक , गणपत राठोड , प्रेमचंद चव्हाण , गणेश आडे , विष्णू पवार , राहुल जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .
बंगाली समाजाची बैठक काली माता मंदिर या ठिकाणी झाली या बैठकीमध्ये बरुण दास , दिनबहादूर सेन , जयदर बिश्वास , अमित दास गुप्ता , समीत दत्ता मनोज सिंग सहा सह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते .
शिरवी समाज कळंबोली यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिरवी समाजाचे नेते धनाराम चौधरी , रामलाल शिरवी नरेंद्र शिरवी, कानाराम शिरवी, श्री जगदीश शिरवी , प्रतापराम शिरवी मानारामशिरवी सुखाराम शिरवी इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 
उत्तराखंड समाजाबरोबर झालेल्या बैठकीत प्रमोद सिंग राणा , गब्बरसिंग पवार , हयात सिंग नेगी , सुमेर सिंग नेगी , सुरत सिंग राणा , धुमसिंग पवार गंगासिंग नेगी व दिगंबर रावत उपस्थित होते .
राजस्थान सेवा संघ यांच्यासोबत बिमा कॉम्प्लेक्स येथे बैठक झाली या बैठकीमध्ये प्रदीप कस्वा , शाम पारिख मधुसूदन सोनी , मुकेश शर्मा , अनिल जैन , सुशील शर्मा , सुरेख पारिख , प्रमोद सोनी , कृष्णकांत सोनी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
मल्याळम समाज यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये प्रकाश करिपल्ली , लक्ष्मणन पटाणी , श्रीधरन नायर शशिकुमार उन्नी कृष्णन शाहीद बाबू एक व्ही इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . 
या सर्व बैठकांना आमदार दयानंद सोपटे व बबन बारगजे यांनी मार्गदर्शन केले व येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे सर्वांनी आश्वासन दिले .
थोडे नवीन जरा जुने