पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार लिना गरड यांच्या प्रचाराला आता चांगलाच जोर धरला असून, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जावून मशाल हे चिन्ह पोहचवित असून मशाल या चिन्हासमोरील बटण दाबून लिना गरड यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पनवेल शहर, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर आदी भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे आता रस्त्यावर उतरले आहेत. घरोघरी जावून प्रचाराचा वेग वाढत चालला आहे. लिना गरड यांचे परिचय पत्रक तसेच त्यांना मशाल या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, अशा स्वरुपाच्या पत्रकांचे वाटप जोरदारपणे सुरू आहे. या प्रचारात तरुण वर्ग सुद्धा मोठा हिरीहिरीने भाग घेत असून
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर बैठका, विविध समाज संघटना यांच्याशी संपर्क साधून त्यांना महाविकास आघाडीमार्फत यापूर्वी झालेली विकासाची कामे तसेच सत्तेत आल्यावर पनवेलच्या विकासासाठी करण्यात येणारी कामे याची माहिती जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आता चांगलेच प्रचारात एकरुप होवून उतरले असून मशालीचा आवाज प्रत्येक शहरात, गल्लीत, विभागात दुमदुमू लागला आहे. यामुळे विरोधकांना याची चांगलीच धडकी बसल्याची चर्चा आहे.
Tags
पनवेल