पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः सुप्रिम एंजल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले.
काळानुसार वाढत चाललेल्या सामाजिक आणि आर्थिक बदलाचे परिणाम शैक्षणिक क्षेत्रातही दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची पद्धत सोपी व्हावी म्हणून सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे
. परंतु या सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे अनेक विद्यार्थी मानसिक त्रासाला बळी पडले आहेत. भारतामध्ये 12 ते 17 वर्षीय विद्यार्थी 25% डिप्रेशनमध्ये आणि 35% अॅक्सिएटीचे शिकार झाले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शरिरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. हे सर्व लक्षात घेवून सुप्रिम एंजल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश ढेकणे हे मेंटल हेल्थ आणि सायकॉलिजीकल काऊंन्सलर सुद्धा आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होण्यासाठी व त्यांचा मानसिक त्रास कमी होण्यासाठी मोफत ते विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच मार्गदर्शन करत असतात.
समाजात बदल घडविणे हे फक्त शासनाचे काम नसून प्रत्येक व्यक्तीचे सुद्धा काम आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाबद्दल एक वाक्य सांगितले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. त्यामुळे समाजातील सुशिक्षित लोकांचे काम आहे हे वाघिणीच्या दुधाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना पाजावे आणि जनकल्याण करावे. यादृष्टीने अध्यक्ष गणेश ढेकणे हे या प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
Tags
पनवेल