कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडलेला इसम परतलाच नाही




पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कचरा टाकण्यासाठी बाहेर गेलेला इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
सागर धनंजय पाटील (29, रा.खारघर) असे या इसमाचे नाव असून उंची 5 फुट, रंग सावळा, केस काळे बारीक, तोंडाजवळ बारीक मिशी, बांधा जाडसर, नाक सरळ, चेहरा गोलसर, डोक्यावर उजव्या बाजूस व कानामागे व पोटावर ऑपरेशनचे दोन व्रण आहेत. डोळ्याने कमी दिसते.

 तसेच वागणे हे गतीमंद व्यक्तीसारखे आहे. अंगात निळ्या रंगाची सॅण्डो बनियान व काळ्या रंगाची बरमुडा पॅन्ट घातलेली आहे. त्याला हिंदी, मराठी भाषा बोलता येते. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी खारघर पोलीस ठाणे किंवा पोलीस नाईक जी.डी.आव्हाड यांच्याशी संपर्क साधावा.

थोडे नवीन जरा जुने