पनवेल, दि.12 (संजय कदम) ः महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांनी बृहन्मुंबई पोलीस दलातील ओशिवरा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीला गुन्ह्यातील मुद्देमालासह पकडला असून त्याला अधिक तपास करून ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ओशिवरा पोलीस ठाणे येथे एक गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्यामध्ये अपहार झालेली क्रेटा कार क्र.एमएच 02 एफयु 3534 मुंबई कडून पुणे बाजूकडे प्रवास करीत असलेबाबत नियंत्रण कक्ष, महामार्ग पोलीस (म.राज्य) मुंबई कडील नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे प्रभारी अधिकारी वैभव रोंगे यांना कळविण्यात आले.
त्याअनुषंगाने ओशिवारा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बर्वे यांचेशी वेळोवेळी संपर्क साधुन तांत्रिक तपासाद्वारे लोकेशन प्राप्त केले असता ते पनेवलजवळील अमेठी कॅालेज तसेच आजुबाजुच्या गावांमध्ये फिरत होते व ते परत एक्सप्रेस वे वर आल्यावर वाहनाचा पाठलाग करुन कि.मी. 6.500 मुंबई लेनवर अपहार झालेली क्रेटा कार व संशयीत आरोपी मोहम्मद साकिब वसीम मुल्ला, वय-22 वर्ष, हारुन कम्पाउंड , कुर्ला व त्याचे तिन साथीदार यांना ताब्यात घेतले.
संशयीत आरोपी व क्रेटा कार ही ओशिवरा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बर्वे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चे प्रभारी अधिकारी वैभव रोंगे यांच्या नेतृत्वखाली पो.हवा. मच्छिंद्र जाधव, विजय भगत, अमित परदेशी, पो.ना अनिल पारधी, नवनाथ जाधव, पो. शि. अरुण जाधव यांनी केली आहे
Tags
पनवेल