दुचाकी चोरीस


पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : एन.एम.एम.टी बस स्टॉप लगत पार्क केलेल्या मोटरसायकलची चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

नागाणा पुजारी हे नवनाथ नगर झोपडपट्टी पनवेल येथे राहत असून ते भावाची दुचाकी घेऊन पळस्पे फाटा येथे गेले होते. त्यांनी घरी आल्यानंतर एनएमएमटी बस स्टैंड लगतच्या रस्त्यावर मोटरसायकल पार्क करून ते घरी जेवण करण्यास गेले. त्यानंतर थोड्या वेळाने ते गाडी जवळ आले असता त्यांना मोटरसायकल दिसून आली नाही.
थोडे नवीन जरा जुने