मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडे यांची हत्या


सांगली जिल्ह्यात मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडेंची हत्या झाली आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेच्या कारणामुळे ही हत्या झाली असल्याचे सांगितले जात आहे. 
सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
थोडे नवीन जरा जुने