शेतकरी कामगार पक्षाची स्थापना हीच मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे. अलिबागचे नारायण नागो पाटील यांच्या घरी नेहमी जात असत. जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अलिबाग कोर्टामध्ये जात असत त्यावेळेस नारायण नागो पाटील यांच्या घरी वस्तीला असत. आजही त्यांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी एक स्वतंत्र रूम त्यांच्या आठवणी खातर ठेवण्यात आलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा दलित समाजाच्या व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना अतिशय मानसन्मानाची वागणूक देतो म्हणून आंबेडकरी चळवळीतले सर्व गट हे शेतकरी कामगार पक्षाला मानतात. शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीला मानतात. महेश साळुंखे यांनी असेही पुढे सांगितले की पनवेल उरण मध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही आंबेडकरी चळवळींचे कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांना आपण सोबत घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे दोन उमेदवार प्रीतम जनार्दन म्हात्रे आणि बाळाराम दत्तात्रय पाटील यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार आहे.
या बैठकीसाठी पनवेल तालुका अध्यक्ष सचिन कांबळे पनवेल महानगरपालिका अध्यक्ष निलेश कांबळे भारत दातार मनोज कांबळे समाधान कांबळे महिला आघाडीच्या अध्यक्ष मुमताज अंन्सार पठाण, सुमन सदाशिव पाटील रखमाबाई बापू पाटील फातिमा अब्दुल मुल्ला रेहाना अन्सारी कविता ठाकूर खुशबू खान अल्ताफ पठाण दिनेश पाटील त्याचप्रमाणे उरण तालुका अध्यक्ष अमित वाघमारे अशोक वाघमारे अक्षय वाघमारे प्रल्हाद कांबळे संतोष गायकवाड मंजुळा वाघमारे रोहन म्हात्रे संतोष गावंड हेमंत ठाकूर धनराज खैरे बळीराम गायकवाड लोचन गायकवाड रमाताई पंडित चंद्रकांत वेळासकर मयूर गायकवाड सोनाली महेश साळुंखे विजू सांबार रेखा जाधव एकनाथ गायकवाड गीता वेळासकर सविता गायकवाड संजय गायकवाड निशा पाटील सोपान पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे खारघर येथील त्याचप्रमाणे सुनील कुमार श्यामलाल घारू अजित खेरवाल त्याचबरोबर पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव अरुण जाधव उपस्थित होते. याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरात जे. एम.म्हात्रे प्रीतम म्हात्रे बाळाराम पाटील इत्यादी महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल