महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. लीना अर्जुन गरड यांच्या प्रचाराची पनवेल शहरातून सुरुवात


पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : पनवेल विधानसभा १८८ निवडणूक २०२४ महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. लीना अर्जुन गरड यांच्या प्रचाराची शहरातील सुरुवात पनवेल शहर शाखा हनुमान मंदिरातून शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली तसेच कामोठे शहरात प्रचार पत्रक वाटप करण्यात आली.
यावेळी जिल्हा समन्वयक व निरीक्षक अनिल चव्हाण, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत, महानगर समन्वयक दिपक घरत, उपमहानगर प्रमुख अच्युत मनोरे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, राकेश टेमघरे, युवासेना सहसचिव अवचित राउत, निखिल भगत, महिला आघाडीच्या तालुका संपर्क संघटिका सौ. प्रमिला कुरघोडे, शहर संघटिका सौ. अर्चना कुळकर्णी, आजी, माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने