पनवेल (प्रतिनिधी) बृहन महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार व कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.
या संदर्भातील पाठिंबा पत्र महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने प्रदेश सचिव दिलीप खोंड, सामाजिक कार्यकर्ता अजित पवार, सदस्य श्री क्षीरसागर यांनी दिले आहे. यावेळी तेली समाजातील मतदारांनी पनवेल मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे, असे आवाहन प्रदेश सचिव दिलीप खोंड यांनी केले.
Tags
पनवेल