आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च


पनवेल, दि.13 (संजय कदम) ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रुट मार्च करण्यात आला व मतदान शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल बस डेपो, लाईन आळी, जोशी आळी, आदर्श हॉटेल, जय भारत नाका, वीरुपाक्ष मंदिर, कापड बाजार, पनवेल महानगरपालिका, वाल्मिक नगर, परदेशी आळी, नित्यानंद मार्ग, साईनगर, नवनाथ नगर, आझाद नगर, लक्ष्मी नगर झोपडपट्टी, पनवेल रेल्वे स्थानक परिसर, तक्का गाव, फॉरेस्ट कॉलनी, रेल्वे कॉलनी आदी ठिकाणी रुट मार्च करण्यात आला.
 यावेळी या पथकात जीपीचे पथक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आदींसह गोपनीय विभाग पथक सहभागी झाले होते. या पथकाने परिसरातील महत्त्वाची मतदान केंद्रे तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या ठिकाणी रूट मार्च दरम्यान पायी भेटी देवुन, त्यांना परीसर व परीस्थितीची माहिती घेतली.
थोडे नवीन जरा जुने