पनवेल दि.०२ (संजय कदम) : पनवेल शहरातील ठाणे नाका परिसरात असलेल्या बालाजी मेडिकल केमिस्ट अँड ड्रग च्या दुकानात अज्ञात चोरट्याने केलेल्या घरफोडीत रोख रक्कमसह दुकानातील इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
ठाणे नाका परिसरात असलेल्या बालाजी मेडिकलच्या दुकानाचे मुख्य शटर अज्ञात चोरट्याने उचकटून आत प्रवेश करून तेथे असलेली रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.