दिव्यामुळे लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान


पनवेल दि.०२ (वार्ताहर) : कामोठे सेक्टर ३६ मधील इंपिरियल हाईट ह्या 13 मजली इमारती च्या दुसऱ्या मजल्यावर दिव्यामुळे लागलेल्या आयाजित घराचे मोठे नुकसान झाले आहे.

कामोठे सेक्टर ३६ मधील इंपिरियल हाईट ह्या 13 मजली इमारती च्या दुसऱ्या मजल्यावर घरातील नागरिक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सर्व कुटुंब घर बंद करून गेले असता घरात तेवत असलेल्या दिव्यामुळे डेकोरेशन ने पेट घेतला तसेच इतर सामान, फर्निचरनेही पेट घेतला व गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. याआगीत मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशम दलास कळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत घरातील बरंच साहित्य जळून खाक झालं होतं.

थोडे नवीन जरा जुने