पनवेल दि . १८ ( संजय कदम ) : अज्ञात वाहनाच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील जे कुमार इंफ्रापोजक्ट्स कंपनी समोरील रस्त्यावर घडली आहे .
पेण कडून पनवेल कडे जाणाऱ्या रस्त्यावरील जे कुमार इंफ्रापोजक्ट्स कंपनी समोर एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी पुरुष इसमास कोणत्या तरी अज्ञात वाहनाच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून त्यांना उडवल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे . व या अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Tags
पनवेल