किल्ले रायगडच्या दिवाळी अंकाने सातत्याने साहित्यिक अभिरुची जपली आमदार प्रशांत ठाकूर





पनवेल(प्रतिनिधी) दैनिक किल्ले रायगडच्या दिवाळी अंकाने सातत्याने साहित्यिक अभिरुची जपली आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले. पनवेल येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक किल्ले रायगड वृत्तपत्राच्या ५६ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.



यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, जाहिरात व्यवस्थापक प्रदीप वालेकर, तुषार तटकरी, उमेश भोईर, सा. उरण समाचारच्या उप संपादक दीपिका पाटील आदी उपस्थित होते.     
             आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना, स्वर्गीय ल. पा.  वालेकर हे पत्रकारिता क्षेत्रातील आधारस्तंभ होते, त्यांचा वारसा पुढे चालविण्याचे काम त्यांचे कुटुंबीय करीत आहेत असे सांगतानाच किल्ले रायगड साहित्यिकांची परंपरा महाराष्ट्रभर मांडण्याचे काम करीत असल्याचे गौरवोदगारही त्यांनी काढले. पत्रकारितेच्या माध्यमातून योग्य मुद्दे शोधणे आणि ते लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम दैनिक किल्ले रायगड करीत असून परिपूर्ण असा दिवाळी अंक आणि त्यातून वाचकांपर्यंत साहित्य पोहोचविण्याचे काम दैनिक किल्ले रायगड करीत आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले. 



        यावेळी संपादक प्रमोद वालेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले कि, दैनिक किल्ले रायगडला प्रदिर्घ समृद्ध परंपरा लाभली आहे. या परंपरेला साजेल असा सर्वांग सुंदर दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने यावर्षी देखील महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांच्या कसदार साहित्याचा आणि नवोदित साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा या दिवाळी अंकात समावेश करण्यात आला आहे. सामाजिक, साहित्यिक, राजकीय, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असलेले विविध विषयातील परिसवांद या दिवाळी अंकाची जमेची बाजू आहे. रोहिणी हट्टंगडी, मारूती चितम्‌पल्ली, महेश जोशी, दिपक शिकारपूर, उत्तरा सहस्रबुद्धे, निवृत्त कर्नल अनिल आठल्ये, अभिजित खांडकेकर, मानसी नाईक, अभिज्ञा भावे, अमर ओक, ज्योती सुभाष, पृथ्वीराज चव्हाण, भानुदास बेरड, अनिकेत जोशी, दिलीप चावरे, उल्हासदादा पवार, त्याचबरोबर सुरेशचंद्र म्हात्रे, डॉ. समीधा गांधी, प्रकाश बागडे, सुरेंद्र पारवे, गजानन मेघशाम परब, मोरेश्वर बागडे, अनिल जांबकर, गजानन धर्मा म्हात्रे, धनंजय गोंधळी, माया साईनकर, एम. एन. म्हात्रे, अनंत कानू सिंगासने, दिलीप रेडकर आदिंच्या कसदार लेखणीतून साकारलेल्या दर्जेदार साहित्याचा समावेश आहे. 


तसेच साहित्यिकांच्या फॅक्टरीचे जनक कविश्री अे.के.शेख, रंजना करकरे, मीनल वसमतकर, सतिष अहिरे, बाबू फिलीप डिसोजा, डॉ. अविनाश पाटील,रेखा सोनावणे, ए. डी. पाटील, पूजा नाखरे, संदिप बोडके, माधवी मोतलिंग, संजीव शेटे, सतीष साठे, जयवंत पवार, दिपाली सुशांत, रोहिणी नायडू, मुग्धा कुळवे, दिवाकर वैशंपायन, तुकाराम खिल्लारे आदिंच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या कविता-गझल यांचा सहभाग असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  
थोडे नवीन जरा जुने