धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे-आमदार प्रशांत ठाकूर






पनवेल(प्रतिनिधी) धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे, त्या अनुषंगाने यंदाचा रायगड शिव सम्राट दिवाळी अंक आरोग्य विषयक असून त्याचा फायदा वाचकांना होईल, असे प्रतिपादन  भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. पनवेल येथून प्रकाशित होणाऱ्या सा. रायगड शिव सम्राट वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 



              शनिवारी सायंकाळी पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी नगरसवेक मनोज भुजबळ, राजू सोनी, मोतीलाल कोळी, सा. रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, प्रतिनिधी सुभाष वाघपंजे आदी उपस्थित होते. 



   आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हंटले कि, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आपण सर्व वाटचाल करीत आहोत. रत्नाकर पाटील हे गेली अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी विविध सामाजिक विषयाला अनुसरून त्यांचा दिवाळी विशेषांक प्रकाशित होत असतो. यावर्षी त्यांनी आरोग्य विषयक माहिती आपल्या अंकातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा  स्तुत्य प्रयत्न केला आहे. आजार सांगून येत नसतो पण त्याच्या संदर्भात काळजी घेणे जरुरी आहे. त्या अनुषंगाने या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच दिपावली निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 

थोडे नवीन जरा जुने