महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई; पीएफआयच्या सचिवासह तिघांना अटक





पनवेल दि.२० (वार्ताहर) : बंदी घालण्यात आल्यानंतरही पनवेलमध्ये पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालाचाली सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली असून सचिवांसह तिघांना अटक केली आहे. 



पनवेलमधून पीएफआय पनवेलचे सचिव अब्दुल रहीम याकूब सय्यद यांच्यासह सदस्य मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान आणि तन्वीर हमीद खान यांना एटीएसने अटक केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. 


आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे. असे असतानाही पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालाचाली सुरूच आहेत. पनवेलमध्ये यांची बैठक झाल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली आहे.
थोडे नवीन जरा जुने