पनवेल, दि. 08 (वार्ताहर) : कोजागिरी पौर्णिमेस दमा विकारावर रामबाण वनौषधी ठिकाण - श्री स्वामी समर्थ मठ, गावदेवी मंदिराजवळ, गावदेवी पाडा, पनवेल येथे देण्यात येणार आहे. ऋषि मुनींपासून चालत आलेली ही वनौषधी कोजागिरी पौर्णिमेस रात्रौ बारानंतर प्राशन करावी.
या दिवशी शाकाहारी जेवण करावे. सलग तीन वर्षे औषध घेतल्यास दमा पूर्णपणे बरा होतो, असा आयोजकांचा दावा आहे. दमा रूग्ण किंवा रासायनिक कारखान्यात काम करणारे कामगार यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
संपर्क : श्री स्वामी समर्थ मठ, गावदेवी पाडा, पनवेल, अतुल- 9819606212 आलोक - 9702122123, ओंकार - 9820424274, व्हॉट्सअपवर संपर्क करून नाव नोंदवावे. भारतीय सैन्य दल, पोलीस यांना औषध मोफत देण्यात येईल. औषधाची नाममात्र किंमत 60/- रू. राहील.
डायबिटीज साठीची वनौषधी रु. 50/- व दम्यासाठी पावडर प्रती पॅकेट रु. 40/- राहील. रविवार दि. 9.10.2022 रोजी रात्रौ 12.30 वाजता देवी पुजनानंतर नंबराप्रमाणे औषधी वाटप करण्यात येईल, अशी माहीती 1) अतुल अनंत पाटणकर, समाजसेवक मो. 9819606212 व 2) सुधाकरभाऊ घरत, समाजसेवक मठाधिपती मो. 9867676867 यांनी दिली.
सूचना :- कोरोनाचे सरकारी नियम व अटी पाळून वनौषधीचे वाटप सुरक्षित अंतर ठेवून करण्यात येईल.
Tags
पनवेल