पनवेल दि.१० (वार्ताहर) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे हे १२ ऑक्टोबर पासून नाशीक जिल्ह्याच्या तीन दिवसअसून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला येथे जाहीर सभा आयोजीत केलेली आहे.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्या घटनेची आठवण म्हणून स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केलेले आहे. या सभेला रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे १४ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्याचप्रमाणे १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्याचा मेळावा नाशिक येथे होणार आहे. या तिन्ही कार्यक्रमांना महेश साळुंखे मार्गदर्शन करणार आहेत.
या नाशिक दौऱ्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज संसारे, युवा नेते अनिकेत संसारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष बालारामजी जाधव, महाराष्ट्र महासचीव अशोक वाघमारे, मुंबई अध्यक्ष अमित हिरवे, महाराष्ट्र संघटक भगवान गरुड, जेष्ठ नेते अरुण धिवर, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे व कार्यकर्ता, पक्षाचे महाराष्ट्रातील व मुंबईतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Tags
पनवेल