पनवेल दि.१० (वार्ताहर) : वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज मंडळ, कामोठे आयोजित भव्य वधू-वर पालक स्नेहवर्धक परिचय मेळाव्यास (२०२२) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सचिव व ह. भ. प. दामाजी गणपत गोवारी शाळेचे संस्थापक/अध्यक्ष सुरदास (दादा) गोवारी यांनी १०,०००/- रूपये देणगी दिली.
वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सुरदास (दादा) गोवारी यांचे आभार मानले.
यावेळी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, संस्थेचे अध्यक्ष मल्हारी सदाफुले, सचिव चंद्रकांत पोळ, उपाध्यक्ष रमेश सोनवणे व कार्यकारिणी सदस्य श्रीकांत शिंदे, विलास खरटमोल उपस्थित होते.
Tags
पनवेल