पनवेल दि २० (संजय कदम) : साप्ताहिक रायगड पनवेल यांचे यंदाचे दिवाळी अंकाचे आठवे वर्ष असून त्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा सर्वांना आवडेल भावेल व वाचनीय असेल असा अंक दिवाळी भेट म्हणून दिला असून या अंकाच्या माध्यमातून सर्व स्तरातील माहिती एकत्रित करण्याचे काम संपादक संतोष भगत यांनी केले असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगर पालिकेच्या दालनात त्यांनी शुभेच्छा देताना केले
यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, कार्यकारी अभियंता संजय काटेकर, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, संपादक संतोष भगत, पत्रकार संजय कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते,
Tags
पनवेल