पनवेल दि २० (संजय कदम) : पनवेल मधून सातत्याने प्रसिद्ध होणारे सा. रायगड पनवेल हा दिवाळी अंक यंदाही सर्व माहिती पूर्ण आहे वाचनीय आहे वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती यात असल्याने निश्चितच संतोष भगत यांचा हा अंक सुद्धा परिपूर्ण नटलेला असल्याचे प्रतिपादन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने यांनी या अंकाच्या प्रकाशनावेळी केले.
यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने यांच्यासह सा. रायगड पनवेल चे संपादक संतोष भगत, पोलीस कर्मचारी माधव शेवाळे, पत्रकार संजय कदम, दीपक महाडिक, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड, असीम शेख या पत्रकार बांधवांसह मनसेचे पराग बालड आदी उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना वपोनि विजय कादबाने यांनी सांगितले कि, सा. रायगड पनवेल या अंकाचे हजार अंक आगामी काळात निघावेत अशा महत्वपूर्ण शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संजय कदम यांनी केले.
फोटो -
Tags
पनवेल