नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर व सिनिअर स्पर्धेत रायगड तायक्वांदो संघाचा दबदबा





प्रेम पाटणे व निहाल भोईर यांना सुवर्ण पदक 

३१वी ज्युनिअर व ३४वी सिनिअर राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२२-२३ ही स्पर्धा दि. १ ते ३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे पार पडली. 

सदर स्पर्धेसाठी राज्यातून ३० जिल्ह्यातील ६०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत निहाल संजय भोईर याने ७८ किलो खालील गटात रायगड जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक प्राप्त करून दिले तर प्रेम विलास पाटणे याने ७३ किलो खालील वजनी गटात दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले.



रौप्य पदक विजेते खेळाडू: विद्देश वासकर, प्रीती पाटणे, पार्थ जाधव, जयश्री गोसावी, अनुष्का लोखंडे.  कांस्यपदक पदक विजेते खेळाडू: नुपूर पावगे, रोहित सिनलकर, अपूर्वा देसाई, खंतेश वास्कर, भूमी माळी, श्रीजय भगत, प्रांजल पवार. 


या संघातील ७ खेळाडूंची राज्य शासनातर्फे भरविण्यात येणार्‍या मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
सदर संघास संजय भोईर व तुषार सिनलकर यांचे प्रशिक्षण लाभले तर संघ व्यवस्थापक म्हणून दिनेश पडाया व अमोल माळी यांनी काम पाहिले. 


वरील विजेते खेळाडूंचे अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्षा एडवोकेट प्रज्ञा संदीप भगत मॅडम यांनी अभिनंदन केले तर श्री सचिव सचिन माळी व खजिनदार श्री रोहित सिनलकर यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. तसेच संघास प्रोत्साहन म्हणुन आर्या इंटरप्रायजेसचे सर्वेसर्वा श्री प्रदीपशेठ माळी यांनी संघास टी-शर्ट वाटप करून शुभेच्छा दिल्या.
थोडे नवीन जरा जुने