इसम बेपत्ता





पनवेल दि . २३ ( संजय कदम ) : मानसिक तणावातून एक इसम राहत्या घरातून कोणास काही न सांगता कुठे तरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . 



                 जयवंत दिनकर रोकडे ( वय ३७ ) रा. उसर्लीखुर्द , रंग गोरा , चेहरा उभट , उंची ५ फूट ५ इंच असून उजव्या पायाच्या गुडग्याजवळ जुन्या माराची निशाणी उजव्या हातावर मनगटावर जुन्या माराची निशाणी आहे . त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे . त्याच्या डोक्यावरचे केस काळे मागे वळविलेले ,दाढी साधारण वाढलेली आहे , त्याच्या अंगामध्ये औरेज रंगाचा हाफ बाह्याचा टी शर्ट व काळ्या रंगाची फुल पँट घातलेली आहे . या इसमा बाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन - ०२२ - २७४५२३३३ किंवा पोहवा संदीप फाळके यांच्याशी संपर्क साधा . 
थोडे नवीन जरा जुने