पनवेल दि.०६ (संजय कदम) : शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत फिरते विक्री केंद्र योजनेतून बेरोजगारांना
स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने “माझा व्यवसाय माझा हक्क” अशी योजना राबविण्यात आली होती. या योजने अंतर्गत आज शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या माध्यमातून खारघर येथील योजनेच्या लाभार्थी सौ. वैशाली सावंत यांच्या नावे नवीन खारघर येथील शिल्पचौक येथे स्नॅक्स कॉर्नर चा व्यवसाय सुरू करण्यात आला.
यावेळी शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, कळंबोली शहर समन्वयक गिरीश धुमाळ, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर,
महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ. सुजाता कदम, उपतालुका संघटिका सौ. टिया धुमाळ, विभाग संघटिका सौ. वैशाली सावंत, खारघर शहर संघटिका सौ. रूपाली कवळे, उपशहर संघटिका सौ. संपदा धोंगडे, शाखा संघटिका सौ. हुसनारा खान, सौ. रेखा शर्मा आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
पनवेल