खारघर परिसरातून कारटेपची चोरी





पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः खारघर परिसरातून उभ्या असलेल्या महागड्या गाडीतील कारटेप चोरुन नेल्याची घटना घडली आहे.


खारघर वसाहत परिसरात हावरे स्प्लेंडर परिसरात रस्त्यावर एक मारुती कंपनीची गाडी उभी ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडीची डाव्या बाजूची काच फोडून आतमध्ये असलेला महागडा कारटेप चोरुन नेला आहे. 

गेल्या काही दिवसापासून कारटेप चोरीचे प्रमाण वाढल्याने वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे.


थोडे नवीन जरा जुने