पनवेलमधील तारा गावाजवळ ऑडी मध्ये सापडली बॉडी




बंद गाडीत मागच्या सीटखाली मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत


पनवेल-पेण रोडवरील तारा गावच्या हद्दीत एका लाल रंगाच्या ऑडि गाडीमध्ये मृतदेह असल्याचे दिसून आल्याने खळबळ माजली आहे. गाडी क्रमांक एम एच १४ जीए ९५८५ ही गाडी कागदोपत्री पुणे जिल्ह्यातील तेजस प्रकाश साळवे यांच्या मालकीची दिसत आहे.


 सदर गाडी तारा गावच्या हद्दीत एका फार्म हाऊस समोर गेल्या २ दिवसापासून उभी आहे. या गाडीत एका पुरुषाचा मृतदेह असून त्याने अंगावर टीशर्ट, जीन्स पॅन्ट घातलेली असून पायात स्पोर्ट्स शूज आहेत. सापडलेला मृतदेह नक्की कोणाचा आहे याबाबत पोलिसांकडून तपास केला जातोय. मात्र ऑडी सारख्या लक्झरी कारमध्ये मृतदेह सापडल्याने ही हाय प्रोफाइल केस असल्याचे नागरिकांकडून बोललं जातंय.


थोडे नवीन जरा जुने