पनवेल दि.१८ (संजय कदम): अलिबाग येथील स्थळ: शेतकरी भवन, अलिबाग नगरपालिकेसमोर येत्या रविवारी सकाळी ११ वाजता कोविड योद्धांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे नेते, आमदार भाई जयंत पाटील प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. कॉम्रेड मनोज यादव, अध्यक्ष व कॉम्रेड जगनारायण गुप्ता (कहार) सचिव म्युनिसिपल कामगार एकता युनियन, उपाध्यक्ष कॉम्रेड प्रमोद नवार, कॉम्रेड सुशिल देवरुखकर, कॉम्रेड अशोक पवार, अभिजित जाधव हे मार्गदर्शक आहेत.

कोरोना महामारीतून बाहेर पडून आपण सारेजण मोकळा श्वास घेऊ लागलो आहोत. या महामारीत अनेकांचे जीव केवळ टांगणीलाच लागले नव्हते, तर कुणालाही आपला जीव वाचेल याची शाश्वती नव्हती. रक्ताची नाती कोव्हीड रुग्णाला साधा स्पर्शही करायला तयार नव्हते. अशा वेळी आपल्या प्राणाची पर्वा न करता ज्या कोव्हीड योध्दाने रुग्णांची सेवा केली. त्या सेवेला तोड नाही. आपल्या प्राणाची बाजी लावून ज्या तरुण- तरुणींनी कोव्हिड काळात युध्द पातळीवर काम केले. त्यांच्यासाठी आता काही करायची वेळ आली आहे. या सर्व कोव्हिड योद्धांना बोनस अथवा बक्षीस म्हणून किमान २५ हजार रुपये देण्यात यावे. तसेच नगरपालिका,

महानगरपालिका व अन्य शासकिय रुग्णालये व अन्य ठिकाणी सामावून घेण्यात यावे, अशी मागणी म्युनिसिपल कामगार एकता युनियन करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योद्धांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यांचे म्युनिसिपल कामगार एकता युनियन स्वागत करीत असतानाच या घोषणेची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करीत आहोत. कोव्हिड योध्दांना न्याय देण्यासाठी अन्य त्यांना खंबीरपणे साथ देण्यासाठी राज्यभर कोव्हिड योद्धांचे मेळावे घेत आहे. या मेळाव्यात उत्फूर्त पाठिंबा मिळत आहे. २४ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईत शिरोडकर सभागृहात झालेल्या मेळाव्यात अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. यानंतर उत्तर महाराष्ट्रातील कोव्हिड योद्धांचा मेळावा नाशिक येथे दि. ६.११.२०२२ रोजी सीटु, कामगार भवन, खुटवड नगर, नाशिक, तसेच रविवार दि. १३.११.२०२२ रोजी कै. वा. ब. गोगटे विद्यानिकेतन क्र. ७, ३१८, नारायण पेठ, पूणे येथे आयोजित केला होता. त्यानुसार रविवार दि. २०.११.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता अलिबाग येथील शेतकरी भवन, अलीबाग नगरपालिकेसमोर, आयोजित करण्यात आला आहे.
.jpg)
या मेळाव्यात कोरोना महामारीत जे तरुण-तरुणी शासकीय निमशासकीय अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्ण सेवेचे काम करीत होते त्या सर्वांना सेवेत कायम स्वरुपी सामावून घेण्यात यावे. कोव्हिड योद्धांना जाहिर करण्यात आलेला 'कोव्हिड भत्ता' त्वरित देण्यात यावा. * कोव्हिड योध्दांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. अशी मागणी म्युनिसिपल कामगार एकता युनियनच्यावतीने करण्यात येणार आहे
या मेळाव्यासंदर्भात अंधुक माहिती करीत अविनाश गोपाळे - ९९३००७९३५२ / गिरीश खोत - ९५०३६३००५६ / प्रतिक महाले ८८६२०६१९९० यांच्याशी संपर्क साधावा
टिप - कोव्हिड योद्धे यांनी सभासद नोंदणीसाठी खालील कागदपत्रे सोबत आणावीत.
१) ओळखपत्र, नियुक्तीपत्र, मानधन नोंद (बँक पासबुक), प्रमाणपत्र, आधारकार्ड.