*eMpower च्या कॅलेंडर चा ग्रँड अनावरण सोहळा आणि मराठा महासंमेलन नियोजन मिटिंग उत्साहात संपन्न*

 
                      

   आज रविवारी सकाळी 11:30  स्वामी समर्थ मंदिर सेक्टर 34 कामोठे येथे उत्साहात संपन्न झाला.  शिवसेना पनवेल महानगर संपर्क प्रमुख मा रामदासजी शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. अर्जुन गरड, उद्योजक मा मधू पाटील, मा. नगरसेविका श्रीमती लीना गरड, खारघर मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष मा. कालिदास देशमुख, भाजयुमो नेते मा हर्षवर्धन पाटील, शिवसेना नेत्या ऍड. श्रीमती सुलक्षणा जगदाळे, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक मा. सचिन सावंत देसाई, नॅशनल को ऑप बँकेचे मा. बाळासाहेब पवार,


 सहाय्यक आयुक्त जि एस टी मा. सुबोध लवटे, ज्येष्ठ उद्योजक मा. केशव शेलार, डॉ वैभव अंधारे,  श्री इन्फ्रा बिल्डर्स व डेव्हलपर्स चे मा. प्रवीण बोराटे, मराठवाडा मित्र परिवाराचे संस्थापक मा. मनोज सोमवंशी यांच्या उपस्थितीत आणि जे मराठा जोडो अभियानात महत्वाची कामगिरी करणारे दस हजारी मनसबदार रोहित चव्हाण, स्नेहल दवंग, शैलेश ठुबे, मनीषा आग्रे, दीपिका भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  कॅलेंडर ड्राफ्टिंग चे महत्वाचे काम करणारे रोहित चव्हाण, सुरज भोसले, ऍड. समाधान काशीद, सईराजे भोसले यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.                                   



 माराठा महासंमेलन नियोजन बैठक याचवेळी घेण्यात आली. दहा दिवसाच्या ह्या संमेलनात संपूर्ण MMR रिजन मधील मराठा बांधव मेळाव्यात सहभागी होतील असा महामेळावा असेल. मराठा समाजातील उद्योजक व्यावसायिक यांची ब्रॅण्डिंग व्हावी आणि समजाअंतर्गत बॉण्डिंग व्हावी असा "ब्रॅण्डिंग आणि बॉण्डिंग" या थीम वर आधारित हा भव्य महामेळावा असेल असं नियोजन आहे हे शहाजी भोसले यांनी प्रस्ताविकात नमूद केले. मा. मधू पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्वानी आपापल्या परीने महामेळाव्याच्या कार्याला ताकत लावावी असं आवाहन केलं. मराठा महासंमेलनाचे उदघाट्न मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते व्हावं यासाठी मा. खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थिती बाबत प्रयत्न करून मा. शेवाळे साहेबांनी होकार मिळवला त्याबद्दल मा. शेवाळे साहेबांचे आभार माणण्यात आले.

 महामेळाव्यास आणि मराठा समाजच्या उत्कर्षांच्या या कार्यात सर्वतोपारी मदत करण्याबाबत मा. शेवाळे साहेबांनी आपल्या भाषणावेळी आश्वस्त केले. मा. अर्जुन गरड साहेबांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात मराठा महामेळाव्याचे आयोजन भव्य आणि दिव्य असायला पाहिजे, त्यासाठी तसेच मोठे व्हिजन ठेवून नियोजन करण्याबाबत साहेबांनी मार्गदर्शन केले. उदघाट्न मा. मुख्यमंत्री साहेब, तसेच उपस्थिती मा. अजित दादा पावर यांची असावी. मराठा समाजातील सर्व राजकीय पक्षातील मा. आमदार, मा. खासदार, मा. मंत्री महोदय यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन मेळाव्यास लाभावे असे नियोजन करु, त्यानुषंगाने काही आमदार, खासदार महोदयांशी बोलून उपस्थिती बाबत तत्वतः होकार मिळवला असल्याचे त्यांनी नमूद केले.  या कार्यक्रमावेळी वर उल्लेख केलेल्या ज्या दस हजारी मनसबदारांनी 50 पेक्षा जास्त मराठा कुटुंबे जोडली त्यांना मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. मराठा महासंमेलनासाठी अंदाजित वीस ते बावीस लाख खर्च अपेक्षित आहे, त्यासाठी ही रक्कम समाजातून उभी राहणे अपेक्षित असल्याने काही दानशूर बंधू भगिनीं यांनी साधारण पाच लाख रुपये देणगी रक्कम जाहीर केली. त्यांची नावे स्वतंत्र पोस्ट मध्ये जाहीर करण्यात येतील.

 कार्यक्रमासाठी eMpower चे सर्व शिलेदार, दस हजारी मनसबदार, eMpower महिला बचत गटाच्या सर्व भगिनी,  खारघर, कळंबोली, करंजाडे, कामोठे, पनवेल, मानखुर्द, नवी मुंबई परिसरातून मराठा समाजातील उद्योजक, व्यावसायिक, आणि सामाजिक कामाची आवड असणारे बांधव आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी eMpower च्या संपूर्ण टीम ने खुप मेहनत आणि उत्तम नियोजन केले. कॅलेंडर अनावरण, मराठा महासंमेलन नियोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शेकडो मराठ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


थोडे नवीन जरा जुने