के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या दहावी शाखेच्या विद्यार्थिनी चे स्नेहमिलन संपन्न

  



पनवेल दि २७ (वार्ताहर) :  के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या   दहावी शाखेच्या   विद्यार्थिनी चे स्नेह मिलन जैन हॉल पनवेल येथे सम्पन्न झाले . 
            सत्तरी पार केलेल्या सुमारे ४० जणीनी यात सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रामुख्याने  अमेरिकेत स्थायीक असलेल्या उज्ज्वला शेठ तसेच बैंगलोर, नाशिक, पुणे , ठाणे , डोंबिवली आदि विविध शहरांतून आलेल्यानी,  ७०/७५ नव्हे तर १७ वर्ष वयाच्या उत्साहाने सहभाग घेतला .



 सर्वांनी शाळेला भेट देऊन जून्या आठवणींना ऊजाळा दिला . सर्व शिक्षक वृंदाने यथोचित स्वागत केले . शकुंतला बांठीया , सुमन नातू, शकुंतला दिवटे, कुन्दा कुळकर्णी , सुलोचना घांग्रेकर, उज्ज्वला शेठ , पाटकर मैडम , अंजली भगत , प्रेमा सोहोनी , निर्मला मुनोथ, शैला गड़करी आणि अनेक जणिंनी आपले मनोगत व्यक्त केले . बालकलाकार  वृद्धी बांठीया हिने गाणी सादर करुन सर्वांची मने जिंकली . सर्वांना एकत्र आणुन हा कार्यक्रम सफल आणि अविस्मरणीय करण्यासाठी शकुंतला बांठीया यांनी ( मेहता, बंगलोर ) अथक मेहनत घेतली 


.  शालेय मैत्रीला वयाचे बंधन नसते याचे मूर्तिमंत उदाहरण असा हा स्नेह मिलनाचा सोहळा दृष्ट लागण्याजोगे होता अखेरीस सायंकाळच्या वेळीस सर्वांनी एकमेकांचा जड अंतःकरणांनी निरोप घेताना पुन्हा लवकरच भेटू असा निश्चय केला. 


थोडे नवीन जरा जुने