बँक ऑफ महाराष्ट्राच्या अरविंद मोरेंना लोकहितवादी पुरस्कार




पनवेल दि २७ (वार्ताहर) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने नुकतेच १७ वे राज्य स्तरीय कामगार साहित्य संमेलन, मिरज - सांगली येथे आयोजित केले होते. ह्या अनुषंगाने कामगारांसाठी राज्य स्तरीय लेखन स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांनी सहभाग घेतला होता. अरविंद मोरे यांना १७ वे राज्य स्तरीय कामगार साहित्य संमेलन, मिरज - सांगली येथे डॉ. सुरेश भाऊ खाडे, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा हस्ते प्रमाणपत्र व पुरस्कार राशी देऊन गौरविण्यात आले.  

   

                                सदर वैचारिक लेखन स्पर्धेचा विषय राष्ट्र उत्थानासाठी कामगारांचा सहभाग हा होता. विजेत्या कामगारांना लोकहितवादी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर वैचारिक लेखन स्पर्धेत अरविंद संपतराव मोरे, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले व त्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे लोकहितवादी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कल्याण आयुक्त रविराज इळावे जी व उप आयुक्त माधवी सुर्वे उपस्थित होत्या.



 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उप कल्याण आयुक्त, महेंद्र तायडे, सहायक कल्याण आयुक्त, गजेंद्र अहेर, भाऊ नाटळकर, धर्मेंद्र मोरे व पनवेलचे केंद्र प्रमुख प्रवीण सकट यांनी अरविंद मोरेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. लोकहितवादी पुरस्कार अरविंद मोरेंना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

  


थोडे नवीन जरा जुने