मालगाडी खाली सापडून इसमाचा मृत्यू


पनवेल दि. २७ ( संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ६ वरील एका मालगाडी खाली सापडून एका इसमाचा दुर्देवी मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत . 



             सदर इसमाचे अंदाजे वय ( ४२ ) , उंची ५ फूट ५ इंच , अंगाने सडपातळ , रंग काळा सावळा , डोक्यावरील केस साधारण ,नाक सरळ , चेहरा उभट असून त्याच्या अंगावर निळ्या व पांढऱ्या रंगाचा मोठ्या चेक्स असलेल्या बाह्यांचा टी शर्ट व काळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट घातलेली आहे . या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक भालचंद्र जाधव यांच्या शी संपर्क साधावा . 




थोडे नवीन जरा जुने