शेंगा विक्री करण्याऱ्या इसमाचा आढळला मृतदेह







पनवेल दि २७ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील नावडे गाव येथे शेंगा विक्री करणाऱ्या इसमाचा मृतदेह एका झोपडीत आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत . 



           तालुक्यातील मुंब्रा - पनवेल हायवे नावडे गाव येथे सदर इसम शेंगा विक्री करीत असे त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष, अंगाने मध्यम , उंची १६८ सेमी , रंग सावळा , केस काळे ,चेहरा उभट असून अंगावर पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट त्यावर गुलाबी रंगाच्या रेषा आहेत . तसेच फिकट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे . या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा सपोनि नरेंद्र कोंडे यांच्याशी सपंर्क साधावा .

 
 
थोडे नवीन जरा जुने