हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी आता खारघरमध्ये उपलब्ध

डॉ. मनोज गुप्ता यांच्या 'प्राणा' ह्या हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी सेंटरचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल दि.१४ (संजय कदम) : डॉ. मनोज गुप्ता यांनी खारघर सेक्टर 12 येथे ‘प्राणा’ हे हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.


हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी या उपचार पद्धतीत दाब हा साधारणतः नेहमीपेक्षा दुप्पट केला जातो. त्यामुळे रुग्ण 100 टक्के ऑक्सिजन श्वास घेतो. या वाढलेल्या ऑक्सिजनच्या दाबामुळे ऑक्सिजन हा प्लाझ्मामध्ये अधिक प्रमाणात विरघळतो. त्यामुळे दीर्घकाळ आणि अधिक समस्यांनी युक्त अशा जखमाही भरुन येतात. यापूर्वी ही थेरपी मुंबईमध्ये उपलब्ध होती. पनवेलसह नवी मुंबईतील रुग्णांनाही या सेवेचा लाभ मिळावा याकरिता डॉ. मनोज गुप्ता यांनी खारघर सेक्टर 12 येथे ‘प्राणा’हे हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी सेंटर सुरू केले आहे.


 या उद्घाटन समारंभास पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे, प्रकाश भगत, कळंबोली पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, खारघर पोलीस निरीक्षक संजय पाटील, डॉ. एस. एम. पाटील, गुरूनाथ गायकर, गीता चौधरी, विनोद ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉ. मनोज गुप्ता यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपीची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.


थोडे नवीन जरा जुने