कारतलब खानाच्या फौजेवर शिवरायांचा विजय,उंबरखिंडीत २ फेब्रुवारीला ३६२ वा विजया दिन साजरा ,विविध कार्यक्रमाचे आयोजन





काशिनाथ जाधव : प्रतिनिधी 
पाताळगंगा : २ फेब्रुवारी , ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत  नेताजी पालकर यांचे हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आहे.अशा या इतिहासकालीन असलेले चौक गावामधून भव्य अशी मशाल ज्योत प्रज्योलित करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन ही झालेली ही भूमी आणि सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व महिला सरदार रायबाधन यांच्या ३०  हजार फौजेवर समरभुमी उंबरखिंड येथे मोजक्या मावळ्यांसह २ फेब्रुवारी १६६१ रोजी विजय मिळवला.   


                                                   छत्रपती शिवरायांनी ज्या २७  महत्वपुर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी ही एक लढाई आहे. म्हणून दरवर्षी छावणी येथे ग्रूप ग्राम पंचायत व ग्रामस्थ चावणी पंचायत समिती खालापूर, रायगड जिल्हा परिषद,शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या वतीने या वर्षीही ३६२ वा विजयदिन सोहळा समरभुमी उंबरखिंड छावणी येथे आयोजित करण्यात आला.  शिस्त बद्ध आणि पारंपारिक खेळा बरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. शाळेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा दिला.    



                                                  रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत - खरोशी - पेण यांनी पोवाडा गाऊन शिवभक्तांना मंत्रमुग्ध केल.त्याच बरोबर शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी उंबरखिंड च्या इतिहासासमवेत शिवरायांची दुरदृष्ठी आणी पारदर्शक राजा म्हणून त्यांच्या कार्या चा उजाळा दिला. त्याच बरोबर लहान मुलांना केलेले व्याख्याने नृत्य वर मुलांना घडविलेल्या शिक्षकांचा कौतुक केले. 




                                                      या उंबर खिंडीचा इतिहास असा आहे,की २ फ्रेबु १६६१ रोजी.छत्रपती शिवाजी महाराज्यांनी कारतलब खान स्त्री सरदार रायबागन व तीस हजार फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला.कोकण काबीज करण्यासाठी कारतलब खान हा आंबेनाळ उंबरखिंड मार्गावर उतरणार हे महारांजाना समजताच त्यांनी स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांना पुढे जावून छावणी टाकण्यास सांगितले.स्वराज्याचे सैन्य उंबरखिंडीत उतरेल न उतरेल तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला.एका बाजूने नेताजी पालकर दुस-या बाजूने शिवाजी महाराज असे कोंडीत पकडून अचानक झालेल्या हल्यामुळे खानाच्या सैन्यांनी माघार घ्यावी लागली.या लढाईचे वैशिष्ट्य अशी कि कमी सैन्याने प्रचंड शत्रूंचा गनिमी काव्याने पराभव केला.छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण २७ लढाई केल्या त्यामधील हि उंबरखिंड येथील लढाई.अशी वैशिष्ट्य या उंबरखिंडीची आहे.     



                                          यावेळी शिव दुर्ग मित्र मंडळ लोणावळा -गट विकास अधिकारी - बाळाजी पुरी,वरिष्ठअधिकारी - शिल्पादास मॅडम विस्तार अधिकारी,खालापूर पोलीस उपनिरीक्षक - आरोटे,विस्तार अधिकारी खालापूर - शैलेंद्र तांडेल,ग्रामसेवक - अविनाश पिंपळकर,सरपंच - बाळासाहेब आखाडे ,चव्हाण,वनरक्षक - लोखंडे,ओव्हाळ,सूर्यवंशी वरिष्ठ विस्तार अधिकारी - एम जी शिंदे,अंकित साखरे,अदि उपस्थित होते.यावेळी गुरुवंदना ढोल पथक खोपोली यांनी ढोल वाजवून मानवंदना दिली.





थोडे नवीन जरा जुने