अखेर शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला




  

पनवेल(हरेश साठेविधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपशिवसेनारिपाइंशिक्षक परिषद  मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव केला आहेत्यामुळे शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.



       या निवडणुकीत ९१ टक्के मतदान झाले होतेमतदान झालेल्या एकूण ३५हजार ६९ मतांपैकी ३३ हजार ४५० मते वैधतर १६१९ मते अवैध ठरलीमतमोजणीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्या पसंतीची तब्बल २० हजार ६८३ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला तर पराभूत शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ १० हजार ९९७ मतांवर समाधान मानावे लागले.



ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाया विजयावर प्रतिक्रिया देताना म्हात्रे यांनीहा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहेगेल्या सहा वर्षांत मी जे काम केले त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे३३ संघटनांचा आम्हाला पाठिंबा होता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्रीराज्यातील मंत्री तसेच या मतदार संघातील आमदार आणि शिक्षक सहकाऱ्यांनी मेहनत घेतलीत्यांचा विश्वास सार्थ ठरवून शिक्षकांसाठी सातत्याने काम करीत राहणार असल्याची ग्वाहीम्हात्रे सर यांनी दिलीदरम्यानया विजयाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम

 मंत्री रविंद्र चव्हाणमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरभाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूरआमदार महेश बालदी यांनी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने