वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू
पनवेल दि २७ (वार्ताहर) : वाहनाची ठोकर लागल्याने पायी रस्ता ओलांडून जात असणाऱ्या इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. या इसमच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत. अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             पळस्पे ते जेएनपीटी हायवेवर जेएनपीटी कडे जाणाऱ्या लेनवर लेन दोनवर स्पीड ब्रेकर धाब्याच्या समोर गव्हाण फाटा येथे एका अनोळखी 50 ते 55 वर्षे इसमला अज्ञात वाहनाने ठोकर मारली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची उंची 5.7 फूट, रंगाने सावळा, दाढी मिशी काळी पांढरी आहे. त्याने अंगात काळ्या रंगाचा व त्यावर पांढरे ठिपके असलेला फुल बाह्यांचा शर्ट व पांढरी मळकट लुंगी नेसलेली आहे. या इसमा बाबत अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलिसांची संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने