१२५ आदिवासी मुलांच्या वस्तीगृहास मंजुरी






आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता नागोठणे किंवा नागोठणे परिसरामध्ये वसतिगृह सुरु करण्यास शासनाने मंजूरी दिली


आहे. आदिवासी मुलांचे शासकीय १२५ मुलांचे वसतिगृह नागोठणे येथे सुरु करण्याकरिता पुरेशी आणि सर्व सोयी सुविधांयुक्त इमारत भाड्याने घेण्याचा. निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने अशा प्रकारची सर्व सोयी-सुविधांयुक्त इमारत उपलब्ध असल्यास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक 
आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि. रायगड कार्यालयाशी संपर्क साधून त्याबाबतचा प्रस्ताव २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत सादर करावा, असे आवाहन प्रकल्प 
अधिकारी शशिकला अहिरराव यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने