उल्हास नदीवरील नव्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन


चौक- कर्जत- मुरबाड महामार्गावर दहिवली येथील उल्हास नदीवर जुन्या पुलाच्या शेजारी सुमारे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सोमवारी झाले, या कामासाठी ७ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर होऊन कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख भाईगायकर, संतोष भोईर, संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, संपर्क प्रमुख पंकज पाटील, मनोहर थोरवे, आरपीआय संपर्क नेते धर्मानंद गायकवाड, नगरसेवक राहुल डाळींबकर, सायली शहासने, युवासेना अधिकारी जयेंद्र देशमुख, शहरप्रमुख अभिषेक सुर्वे, सचिन भोईर, नगरसेवक संकेत भासे, किशोर कदम, ,प्रदीप वायकर, नदीम खान, वैभव सुरावकर, दिनेश कडू, सनी चव्हाण, रत्नाकर बडेकर, मोहन भोईर आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने