बेकायदेशीररीत्या गुटका विक्री करणाऱ्या ९ टपऱ्यांवर शहर पोलिसांची कारवाई

पनवेल दि.१७ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनातर्फे बंदी असतानाही बेकायदेशीरपणे गुटका विक्री करणाऱ्या पनवेल शहर परिसरातील ९ टपऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. 
गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरातील टपऱ्यांमध्ये बेकायदेशीररित्या गुटका विक्री होत असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शहर परिसरात विविध ठिकाणी असलेल्या टपऱ्यांवर धाड टाकून सदर विक्रीसाठी ठेवलेला गुटका ताब्यात घेतला आहे व टपरी चालकाविरुद्द कारवाई करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने