पोलीस वसाहत नूतनीकरणाच्या प्रतीक्षेतपनवेल येथील पोलीस वसाहतीला अत्याधुनिक स्वरूप प्राप्त होणार होते. या ठिकाणच्या इमारती जमीनदोस्त करून तसेच मोकळया जागेत टाँवर
उभारण्याच्या हालचाली तीन वर्षा पूर्वी सुरु करण्यात आल्या होत्या. पोलीस गृहनिर्माण विभागाकडून हा प्रकल्प राबविण्यात येणार होता. येथे कर्मचाऱ्यांना
प्रशस्त सदनिका राहण्याकरीता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. परंतु पनवेल पालिकेकडून प्लॅन होऊन चार वर्षाचा कालावधी
लोटला असून सुद्धा अजून पोलीस वसाहत नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत.
पनवेल तालुक्यामध्ये खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, तालुका पोलीस ठाणे, पनवेल शहर पोलीस ठाणे इत्यादी पोलीस ठाणी आहेत. यामध्ये सहाशेहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. तसेच महापालिका झाल्यामुळे भविष्यात येथील पोलिसांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सहा पोलीस ठाण्यांत सुमारे एक हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भविष्यात भासणार आहे. त्यामुळे पोलिसांना राहण्यासाठी हक्काचे वसतिगृह असावे, अशी मागणी होत आहे. पनवेल शहरामधील विशेष सत्र न्यायालयाच्या इमारतीला लागून असलेला मोकळा भूखंड आणि या मोकळ्या भूखंडासोबत पोलिसांची सध्याची ५० हून अधिक घरांची इमारतीचा दीड एकर जमिनीवर सहा टॉवर बांधण्याचा संकल्पित आराखडा तयार झाला आहे. 


या बांधकामासाठी सहा वर्षा पूर्वी सुमारे ८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पनवेल तालुका पोलीस ठाण्यासमोर पोलीस वसाहत असून त्या इमारती जुनाट झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखभाल केली जात नसल्याचे वसाहतीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे या आधी या ठिकाणी जे काही कर्मचारी या ठिकाणी राहत होते ते आणि त्यांचे कुटुंबिय गैरसोयीला सामोरे जात होते. याशिवाय पोलीस कर्मचारी जास्त काळ कर्तव्य बजावतात.


 त्यामुळे त्यांना थकवा येतो घरी आल्यानंतर त्यांना शांतता आणि चांगले वातावरणाची गरज असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना राहण्याकरीता चांगल्या स्वरूपाची सोय असावी अशी मागणी होत आहे. तसा पाठपुरावा सुध्दा गृहनिर्माण विभागाकडे सुरू होता. तालुका पोलीस ठाण्यासमोरील जागेत नवीन पोलीसांकरीता निवास संकुल बांधण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला. त्या वेळी नवी मुंबई पोलीस दलाची सुत्र हाती घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कर्मचाऱ्यांच्या वेल्फेअरकडे अधिक लक्ष दिले होते. पनवेल शहरातील पोलीस वसाहत प्रकल्पाबाबत पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे आणि तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मालोजी शिंदे यांनी सुद्धा याबाबत पोलीस आयुक्तांना साकडे घातले होते.

 त्यानुसार त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. परंतु त्या नंतर घडामोडी मंदावल्या असून पोलीस वसाहती मधील कर्मचाऱ्यांना सुस्थितीत घर मिळणे हे फक्त स्वप्न राहिले आहे.थोडे नवीन जरा जुने