उरण दि 19 (विठ्ठल ममताबादे) दरवर्षी प्रमाणे यंदाही नवतरुण मित्र मंडळ पाणजे यांच्या वतीने ताडाचा बंगला येथे महाशिवरात्री उत्सव व श्री आकादेवी मंदिर, पाणजे येथे श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार दि 18 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. श्रीचे मंगलस्नान अभिषेक पूजन, श्री साईनाथ भजन मंडळ पाणजे यांचे भजन , श्री सत्यनारायणाची महापूजा,तीर्थ प्रसाद,मान्यवरांचे स्वागत, नवनिर्वाचित सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ, सरपंच लखपती पाटील व माजी उपसरपंच अविनाश पाटील यांच्या वतीने मनोरंनार्थ नवतरुण मित्रमंडळ प्रस्तूत शिवशंभो ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध गायक जगदिश पाटील, मोहन फुंडेकर ,रोहित पाटील , सोनाली भाईर,नेहा केने तसेच पपण पाटील यांच्या शिवमुद्रा नृत्य ग्रुप यांनी कोळीगीत गाउन, नृत्य करून रसिक प्रेमकांची मने जिंकली. सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवतरुण मित्र मंडळ पाणजे सर्व सदस्य आणि हितचिंतक,
,साई समर्थ बँजो पथक पाणजे,नवदुर्गा बचत गट पाणजे,ग्रामपंचायत व ग्रामसुधारणा मंडळ पाणजे, शिवजयंती उत्सव मंडळ पाणजे या सर्व संस्था संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
महाशिरात्री उत्सव आणि सत्यनाराणाच्या महापूजे निमित्त नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्वाचीत सरपंच लखपती पाटील आणि सर्व सदस्य तसेच ग्रामसुधारणा मंडळांचे अध्यक्ष हेमंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उ्घाटक विष्णू जाधव (साई एन्टरटेनमेंट डेवलापर्स), विनय मोरे, परशुराम भोईर, अविनाश पाटील, लीलेश्वर भोईर व सर्व मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.मंडळांचे अध्यक्ष दर्शन पाटील आणि हेमंत पाटील आणि विश्वनाथ पाटील यांनी उत्तम सूत्रसंचलन करून स्वागत आणि आभार मानले.
Tags
उरण