आ. प्रशांत ठाकूरांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद




कामोठे येथे 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान, रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.



यासोबतच रायगड जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड मेहनत करून आपले उत्पादन बाजारपेठेत ग्राहकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असतात, हा कृषी महोत्सव या सर्वांना ग्राहकांपर्यंत पोहचविणारा आणि आपल्या मालाबद्दल अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. या जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना आणि उपक्रमांची माहिती, कृषी तंत्रज्ञान, नाविण्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय याबाबतचे बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, कृषी प्रदर्शन, परिसंवाद आणि उद्योजकांची व्याखाने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य, कडधान्ये आणि खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले, भाजीपाला महोत्सवाचे आयोजन करण्यात



आले होते.

या महोत्सवास आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शेतकरी आणि उद्योजकांशी संवाद साधला. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास घरत, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, आत्माराम हातमोडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने