काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १३ फेब्रुवारी, आज जिल्ह्यात विविध संस्था कार्यरत आहेत.आणी ते आपले समाज कार्य कोणत्याही अपेक्षा न करता करत असतात.मात्र काही वेळा संस्थे मार्फत आलेल्या वस्तू सर्व सामान्यपर्यंत पोहचत नाही मात्र जनसेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून संतोष शिंगाडे यांनी मातृसेवा फाउंडेशन ठाणे-मुंबई” च्या मदतीने घरातून निघणारा ओला,सुखा कचरा विलिनीकरण करण्यासाठी डस्टबीनचे वाटप करण्यात आले.त्याच बरोबर अपंग व्यक्तीसाठी व्हिलचेअर वाटप करण्यात आले.
संतोष शिंगाडे यांनी समाजसेवेसाठी स्वताला झोकून दिले आहे.नागरिकांची समस्या जाणून घेवून विविध संस्थांच्या मदतीने त्यांनी आपटा ग्रामपंचायत हद्दीत सारसई विभागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.यावेळी ५० कुटुंबातील सदस्यांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर अपंग व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवा यासाठी व्हिलचेअर वाटप करण्यात आले.यामुळे या वस्तू घेतांना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य फुलतांना पहावयास मिळाले
यावेळी अध्यक्षा-मातृसेवा फाउंडेशन, संध्या सावंत मॅडम, . मुग्धा देशपांडे ,माधवी कुलकर्णी,वैशाली जैन मॅडम, . स्मिता दास,मंदार राणे ग्रामस्थ अंगणवाडी सेविका संगीता वाघे - , मा. ग्रा.पं. सदस्य राम वाघे, ग्रामस्थ सुरेश वाघे, वसंत पवार, नरेश माळी ,जनसेवा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संतोष शिंगाडे, व तरुण वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता
Tags
पाताळगंगा