पनवेल /प्रतिनिधी
उसर्ली गावात दर वर्षा प्रामाणे या वर्षी ही शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सरपंच चषकाचे आयोजन माजी सरपंच विश्वास भगत यांनी केले
क्रिकेट प्रेमी चे आकर्षण असलेले हे सामने
प्रकाश झोतात ठेवण्यात आले होते या सामन्याचे उदघाटक भारतीय क्रिकेटर शिवम दूबे,शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील,विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके,रेल्वे संघाचे क्रिकेट सागर जाधव,प्रमुख या पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. या सामन्यात 36 संघाने सहभाग घेतला होता. या सामन्याचे पहिले 2 लाखाचे बक्षीस व भव्य चषक अथर्व प्रिन्सी कानपोली संघाने पटकवले. तर दुसरा क्रमांकाचे 1 लाखाचे बक्षीस श्री. दत्त भातान या संघाने पटकवला. तिसरा क्रमांकाचे आर. सी सी. पेठ संघाने 60000 रुपये बक्षीस पटकवले.चौथे बक्षीस सागर सम्राट भवरा 40000 यांनी पटकवला असून सर्वत्र कौतुक होत आहे या सामान्याच्या माध्यमातून खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे मत सामन्याचे आयोजक माजी सरपंच विश्वास भगत यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले
Tags
पनवेल