महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटने तर्फे 14 मार्च पासून बेमुदत संपाची हाक.






शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे संघटनेतर्फे आवाहन.


उरण. दि 8 (विठ्ठल ममताबादे) नगर परिषद, नगरपंचायती मध्ये काम करणा-या शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाचे अनेक विविध मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्या विषयी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेतर्फे शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठविला आहे.कायदेशीर व शांततेच्या मार्गाने शासनाशी पत्रव्यवहार सुद्धा केला मात्र अधिकारी कर्मचा-यांच्या मागण्या,समस्या सुटत नसल्याने शेवटी संघटनेने बेमुदत संपाचे हत्यार उपसले असून सदर संघटनेने 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.





महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना चे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे, कार्याध्यक्ष विश्वनाथ घुगे,प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप रावणकर, प्रदेश सरचिणीस सुरेश पोसतांडेल, प्रदेश कोषाध्यक्ष अनिल पवार, संघटक केशव कानपुडे,दिपकजी रोडे , धर्माजी खिल्लारे, अभिजीत गोरे, किरण आहेर, माधव पाटील आदी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका,नगर परिषद, नगरपंचायत मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी या बेमुदत संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.






थोडे नवीन जरा जुने