पनवेल दि.२७ (वार्ताहर) : लोकलच्या रॅकमध्ये ठेवलेली लॅपटॉपची बॅग लंपास झाल्याची घटना रेल्वे प्रवासादरम्यान घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पनवेलमध्ये राहणारा संदेश पाटील हा प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनलवरून लोकलने घराकडे परत येत असताना त्याने त्याची बॅग लोकलमधील रॅकवर ठेवली होती.
लोकल खारघरला आल्यानंतर त्याने रॅकवर बॅग पाहिले असता बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्याच्या बॅगेत लॅपटॉप, रोख रक्कम असा ९२ हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Tags
पनवेल